Vastu Tips: स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वारंवार पडणे असते अशुभ, सुरु होते वाईट वेळ

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबावर वाईट वेळ येते. जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' तीन गोष्टी.

Soneshwar Patil | Dec 07, 2024, 18:23 PM IST
1/7

अशुभ

स्वयंपाकघरातील वस्तू पडणे हे सामान्य गोष्ट आहे. पण काही गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ मानले जाते. 

2/7

समस्या

स्वयंपाकघरातील या गोष्टी सतत पडत असतील तर त्याचा अर्थ तुम्हाला पुढे समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे सतर्क रहा. 

3/7

दूध

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात जर दूध एकदा सांडले तर ते सामान्य आहे. परंतु, जर सतत दूध सांडत असेल तर ते अयोग्य आहे. 

4/7

संकट

जर असं सतत घडत असेल तर तुमच्या मार्गावर काही संकट येण्याची चिन्हे असू शकतात. 

5/7

मीठ

त्याचबरोबर जर स्वयंपाकघरात मीठ वारंवार पडत असेल तर हे देखील तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी अशुभ मानले जाते. कारण मीठ चंद्र आणि शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते.   

6/7

मोहरीचे तेल

तसेच स्वयंपाकघरात जर मोहरीचे तेल सांडले तर ते अशुभ मानले जाते. कारण मोहरीच्या तेलाचा संबंध न्याय देवता शनिदेवाशी आहे. 

7/7

रहा सतर्क

त्यामुळे मीठ, दूध आणि मोहरीचे तेल सतत पडत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सतर्क रहा.