Instagram वर सतत तुमचं प्रोफाइल कोण चेक करतं? कसं जाणून घ्याल 'त्या' व्यक्तीचं नाव

इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त कोणी सक्रिय असतं तर ती आहे तरुण पिढी. सगळेच तरुण सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. पण या प्लॅटफॉर्मचा वापर काही लोक चुकीच्या कामासाठी किंवा चुकिच्या पद्धतीनं करतात. काही लोक तुम्हाला फॉलो करत नाहीत. पण तुमचं प्रोफाइल ते पाहू शकतात. तुम्ही काय करता काय नाही करत हे सगळं त्यांना कळतं. 

| Dec 07, 2024, 17:56 PM IST
1/7

अशा अनेक गोष्टी करत ते तुमच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करु शकतात. इन्स्टाग्रामवर असं कोणतंही फीचर नाही. ज्यातून तुम्हाला कळेल की कोण तुमचं प्रोफाइल सतत तपासतय. काही गोष्टींमधून तुम्हाला ते कळतं. 

2/7

इन्स्टाग्रामवर तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे काही लोक तुम्ही काय करता या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. इन्स्टाग्रामवर काही सेटिंग्स आहेत, ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की कोण तुमचं प्रोफाइल पाहतंय. चला तर जाणून घेऊया तुम्ही तुमचं अकाऊंट कसं सेफ ठेवू शकता. 

3/7

सगळ्यात आधी इन्स्टाग्राम अ‍ॅप ओपन करा आणि तुमच्या प्रोफाइलवर जा. त्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या तीन लाइनच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Blocked सेक्शनमध्ये जा. 

4/7

त्यानंतर तिथे ऑप्शन येईल You May Want to Block. त्यावर अनेक लोकांचे प्रोफाइल तुम्हाला दिसली. जर तुम्हाला वाटतंय की कोणी तुम्हाला सतत त्रास देतंय तर तुम्ही त्यांना तिथून ब्लॉक करु शकता. त्यानंतर ती व्यक्ती तुमचं नाव देखील पाहू शकणार नाही. 

5/7

इन्स्टाग्राम तुमची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फीचर्स देतात. या फीचर्सच्या मदतीनं तुम्ही हे निश्चित करु शकता की कोणी अनळोखी व्यक्ती तुम्हा स्टॉक करतंय. याशिवाय तुमच्या प्रोफाइलवर असलेल्या गोष्टींचा चुकीचा वापर करु शकत नाही. 

6/7

जर तुम्हाला वाटतं की कोणत्याही अनओळखी व्यक्ती तुमचं अकाऊंट पाहू नये असं वाटतं असेल तर तुम्ही तशी सेटिंग करु शकता.   

7/7

त्याशिवाय तुम्ही तुमचं अकाऊंट प्रायव्हेट करु शकतात. जेणेकरून लोकं तुमचं प्रोफाइल पाहू शकणार नाही आणि ते फक्त रिक्वेस्ट पाठवू शकतील.