AB de Villiers Emotional Post: "माझे डोळे भरून आलेत", ...अन् खचाखच भरलेल्या स्टेडियमवर MR 360 झाला भावूक!

 MR 360 Emotional Post after RCB Unbox event: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) म्हणजेच आरसीबीने ख्रिस गेल (Chris Gayle) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या सन्मानार्थ 'RCB Unbox' नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Mar 29, 2023, 15:30 PM IST

AB de Villiers Emotional Post: आयपीएलच्या (IPL 2023) आगामी हंगामास सुरूवात होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) म्हणजेच आरसीबीने ख्रिस गेल (Chris Gayle) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या सन्मानार्थ 'RCB Unbox' नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी दोन्ही महान खेळाडूंची जर्सी रिटायर्ड केली गेलीये. ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना आदराचं चिन्ह म्हणून RCB हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केलं. त्यावर एबी डिव्हिलियर्सने भावूक पोस्ट लिहिली आहे. (AB de Villiers Emotional Post after RCB Unbox event Ahead Of Indian Premier League 2023 says Tears Filled My Eyes latest sports news)

1/5

चिन्नास्वामी येथील आमच्या ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत गेल्यावर खचाखच भरलेल्या स्टेडियमच्या समोर माझे डोळे भरून आले. एबीडीच्या घोषणा ऐकून प्रथमच त्याची तीव्रता जाणवली, ही वेळ वेगळी होती, असं एबीडी म्हणतो.

2/5

जिंकण्याचा मार्ग शोधण्यासाठी ओरडणाऱ्या चाहत्यांना खूश करण्याची तीव्र भूक आमच्या असायची, कार्यक्रमावेळी माझ्या शरीरात भावनांचा समुद्र भरून गेला कारण तुमचं प्रेम मिळाल्याबद्दल मला कृतज्ञ वाटलं. हे एक अभिमानास्पद शहर आहे.  

3/5

आपण अविश्वसनीय टीममेट्सचे प्रतिनिधित्व करतोय, असंही तो म्हणतो. 2003 पासून भारतात घालवलेल्या माझ्या सर्व दिवसांचा विचार करताच अनेक खास आठवणी परत आल्या, असं म्हणत डिव्हिलियर्सने आठवणींना उजाळा दिला आहे.

4/5

मी या देशाचा आणि तेथील लोकांशी सदैव ऋणी आहे. सहकाऱ्यांचे आभार, असं एबीडी म्हणतोय. धन्यवाद आरसीबी, धन्यवाद बंगळुरू विशेषतः विराट, असं म्हणत त्याने लाडक्या विराटचे आभार मानले आहेत.

5/5

दरम्यान, ख्रिस गेलची 333 नंबरची जर्सी आणि एबी डिव्हिलियर्सची 17 नंबरची जर्सी आता मैदानात दिसणार नाही. तीन वर्षांनंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा संघ परतला आहे. चाहत्यांना आरसीबीचा संपूर्ण संघाचा सराव पाहण्याची परवानगी देण्यात आली होती.