Rohit Sharma आणि Salman Khan आहेत एकमेकांचे नातेवाईक? Hitman चं बॉलिवूड कनेक्शन आलं समोर

Relation between Rohit sharma and Salman Khan: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार तसेच टीम इंडियाचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणजेच रोहित शर्मा आणि बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान हे एकमेकांचे नातेवाईक आहेत असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच धक्का बसेल. पण हे खरं आहे. जाणून घेऊयात याच नात्याबद्दल...

Mar 29, 2023, 14:19 PM IST
1/12

Rohit Sharma Salman Khan

खरं तर रोहित शर्मा आणि सलमान खान हे नातेवाईक आहेत याबद्दलची माहिती फारच कमी लोकांना आहे. सलमानचा छोट्या भावाची पत्नी आणि रोहित शर्माच्या पत्नीचं एक खास नातं आहे. या नात्यामुळेच खान आणि शर्मा कुटुंबीय जोडलं गेलं आहे.

2/12

Rohit Sharma Salman Khan

तसं पाहिल्यास मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रामधील सेलिब्रिटींचं नातं असणं हे काही भारतीयांसाठी नवीन राहिलेलं नाही. अनेक क्रिकेटपटू चित्रपटांमध्ये झळकले आहेत. तर मनोरंजन क्षेत्रातही अनेकदा क्रिकेट हा विषय हाताळला गेला आहे. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रं एकमेकांशी अनेकदा जोडली गेलेली आहेत. अशातच आता रोहितचं बॉलिवूड कनेक्शन समोर आलं आहे. रोहित शर्मा आणि बॉलिवूड हे ऐकायला वेगळं वाटलं तरी खरंच असं कनेक्शन आहे.

3/12

Rohit Sharma Salman Khan

तर सलमान आणि रोहितचं नातं हे त्यांच्या घरातील महिलांमुळे आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि सलमानचा छोटा भाऊ सोहेल खान हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

4/12

Rohit Sharma Salman Khan

सोहेल खानची पत्नी सीमा सजदेह म्हणजेच सलमानची वहिनी आणि रितिका सजदेह या दोघी एकमेकांच्या मावस बहिणी आहेत. अर्थात सोहेल आणि सीमा यांचं नातं संपुष्टात आलं आहे. मागील वर्षीच या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. सीमा आता तिचं माहेरचं अडनाव लावते. मात्र असं असलं तरी रितिका ही नात्याने सीमा आणि सोहेलच्या मुलांची मावशी लागते.

5/12

Rohit Sharma Salman Khan

सीमा आणि सोहेल मागील वर्षी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र या दोघांनी 24 वर्ष संसार केला. 1998 साली त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं.

6/12

Rohit Sharma Salman Khan

निर्वाण आणि योहान नावाची दोन मुलं सीमा आणि सोहेल यांना आहेत. सीमा तिच्या मुलांबरोबर पूर्वाश्रमीच्या पतीपासून वेगळी राहते. मात्र हे निर्वाण आणि योहान अनेकदा सोहेलला भेटतात. अनेकदा हे दोघे सोहेलला भेटायला जातात.

7/12

Rohit Sharma Salman Khan

सीमा सजदेह कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अॅण्ड एंटरटेनमेंटचे मालिक बंटी सचदेव यांची सख्खी बहीण आहे. रितिका ही बंटीची मावस बहीण आहे. बंटीची कंपनी अनेक खेळाडूंच्या जाहिरातींचे कंत्राट आणि इतर कामांचं व्यवस्थापन करण्याचं काम करते.

8/12

Rohit Sharma Salman Khan

रोहित शर्मा सुद्धा बंटीच्या कंपनीचा क्लायंट आहे. याच कंपनीच्या माध्यमातून रोहित आणि रितिकाची भेट झाली होती.

9/12

Rohit Sharma Salman Khan

रितिका आधी बंटीच्या कंपनीमध्येच काम करायची. रितिकाने आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या कंपनीत काम करायला सुरुवात केली होती.

10/12

Rohit Sharma Salman Khan

रोहित आणि रितिकाला जेव्हा कन्यारत्न प्राप्ती झाली होती. त्यानंतर सीमाने सोशल मीडियावर या दोघांना शुभेच्छा दिलेल्या.

11/12

Rohit Sharma Salman Khan

काही आठवड्यांपूर्वीच रितिकाच्या सख्ख्या भावाचं म्हणजे कुणालचं लग्न झालं तेव्हा या लग्नाला बंटी आणि सीमा दोघेही उपस्थित होते. सोहेलही या फोटोमध्ये दिसत आहे.

12/12

Rohit Sharma Salman Khan

तशी रोहित आणि रितिकाची लव्ह स्टोरीही फारच फिल्मी आहे. पहिल्या भेटीनंतर या दोघांची मैत्री झाली त्यानंतर 6 वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर रोहितनेच रितिकाला प्रपोज केलं. क्रिकेटच्या मैदानावरच रोहितने तिला प्रपोज केल्यावर रितिकाने होकार दिला होता. दोघेही 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले.