आतड्यांना चिकटलेली घाण खेचून काढतात 7 पदार्थ, कधीच होणार नाही मुळव्याध, बद्धकोष्ठता

Clean Intestive Naturally : पोट साफ न होणं, शौचाला कडक होणं यासारख्या समस्येवर हे 7 पदार्थ ठरतील गुणकारी. आतडे स्वच्छ करून बॉडी करतील डिटॉक्स 

Constipation Relief Foods : तासन् तास शौचाला बसून राहावं लागतं, जोर लावूनही शौचाला साफ होत नाही अशावेळी घरगुती 7 पदार्थ तुम्हाला मऊसूद शौच्छाला होण्यास मदत करतील. 

न्युट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. या 7 पदार्थांच्या माध्यमातून तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल. या पदार्थांमुळे आतड्यांना चिकटलेली घाण देखील निघून जाईल. 

1/7

डाळींचा समावेश

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

सोयाबीन, मसूर आणि चणे फायबरने समृद्ध असतात आणि नियमितपणे आतड्यांची हालचाल सुरळीत राखण्यास मदत करतात. तसेच शौचाला साफ सहज होते. डाळींमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. डाळींचा समावेश खिचडी किंवा सूपच्या स्वरूपात करू शकता. 

2/7

ब्रेडचे प्रकार

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

गव्हाचे ब्रेड, ब्राऊन राइस, क्विनोआ आणि ओट्स यांसारख्या पदार्थांमध्येही फायबरचे प्रमाण चांगले असते. हे तुम्ही ब्रेड किंवा भाताच्या स्वरुपात खाऊ शकता. या सगळ्या पदार्थांत फायबरचे प्रमाण मुबलक असते. 

3/7

फळे खा

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

बेरी, सफरचंद, नाशपाती, संत्री आणि केळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, विशेषत: त्यांच्या सालींसोबत खाल्ल्यास अधिक फायबर मिळते.

4/7

भाज्या खा

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, गाजर आणि रताळे हे फायबरचे उत्तम स्रोत आहेत. फायबरचे प्रमाण आहारात मुबलक प्रमाणात घेतल्यास भाज्या खाणे आवश्यक आहे. 

5/7

चिया सिड्स

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते आणि ते पाणी शोषून घेण्यास मदत करतात, मल मऊ करतात. रात्री चिया सिड्स भिजवून सकाळी स्मुदीमध्ये याचा समावेश करा. शौच्छाला साफ होईल. 

6/7

अळशी

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

अळशीच्या बिया विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही फायबरने समृद्ध असतात आणि ते पचन यंत्रणा सुधारण्यास मदत करतात. अळशीचे मुखशु्द्धी तयार करू शकता. अळशीची पेज किंवा लाडू खाऊ शकता. 

7/7

सुकामेवा

7 Fiber Rich Foods clean colon gut and get rid from Piles Haemorrhoids and Constipation

फायबरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात सुकामेव्याचा समावेश करा. बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.