भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, धर्मेंद्रसह सुपरहिट चित्रपट; यशाच्या शिखरावर सोडली इंडस्ट्री, विवाहित CM च्या प्रेमात पडली, लग्न न करता झाली आई

Guess Who Is This 70s Top Actress: चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहे, ज्यांच्या आयुष्यातील काही किस्से ऐकल्यानंतर त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित होतात. आज अशाच एका 70 च्या दशकातील अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या करिअरदरम्यान तिने अनेक चित्रपटांमध्ये तसंच मोठ्या स्टार्ससह काम केलं आहे. पम एक दिवस अचानक तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर ती एका विवाहित मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली होती.   

Shivraj Yadav | Nov 17, 2024, 17:29 PM IST

Guess Who Is This 70s Top Actress: चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहे, ज्यांच्या आयुष्यातील काही किस्से ऐकल्यानंतर त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित होतात. आज अशाच एका 70 च्या दशकातील अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या करिअरदरम्यान तिने अनेक चित्रपटांमध्ये तसंच मोठ्या स्टार्ससह काम केलं आहे. पम एक दिवस अचानक तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर ती एका विवाहित मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली होती. 

1/10

2/10

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फार माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचं नाव आजही देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जाते. आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच त्यांनी भरपूर प्रसिद्धी आणि संपत्तीही कमावली. इतकंच नाही तर आज करोडो रुपये घेणाऱ्या अभिनेत्रीही या अभिनेत्रीच्या संपत्तीची तुलना करू शकत नाहीत. हे असे नाव आहे ज्याने आपल्या करिअरच्या शिखरावर चित्रपटांमधून निवृत्ती घेतली होती.  

3/10

अलीकडेच, हुरुन इंडिया रिच यादीत, जुही चावलाला सर्वात श्रीमंत अभिनेत्री घोषित करण्यात आले, जिची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सुमारे 30 वर्षांपूर्वी एक अभिनेत्री होती जी जुहीपेक्षाही श्रीमंत होती. त्यांची संपत्ती एवढी होती की मोठी राजघराणीही त्यांच्यासमोर लहान वाटायची.   

4/10

संपत्तीसोबतच ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांमुळे आणि एका विवाहित मुख्यमंत्र्यांसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळेही चर्चेत होती. आपण येथे 70 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री जयराम जयललिता यांच्याबद्दल बोलत आहोत.  

5/10

जे जयललिता यांनी 60 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. जयललिता यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलं. तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या त्या सुपरस्टार होत्या आणि काही बॉलिवूड हिट सिनेमांमध्येही काम केलं होतं.   

6/10

1968 मध्ये धर्मेंद्र यांच्यासह 'इज्जत' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, चित्रपटांपेक्षा राजकारणात त्यांनी अधिक प्रसिद्धी मिळवली आणि भरपूर संपत्तीही कमावली. कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्या प्रसिद्ध अभिनेते शोभन बाबू यांच्या प्रेमात पडल्या. पण त्याचं लग्न झाले होते. या दोघांचा शेवटचा चित्रपट 'डॉक्टर बाबू' होता.  

7/10

यानंतर जयललिता यांचे निकटवर्तीय आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजीआर यांनी त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. 1980 मध्ये, जयललिता यांनी आपलं चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्द सोडून राजकारणाच्या जगात प्रवेश केला आणि MGR यांच्या AIADMK चा एक भाग बनल्या. पक्षात त्यांची लोकप्रियता वाढू लागली, त्यामुळे त्यांचे विरोधकही सक्रिय झाले. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.   

8/10

1997 मध्ये चेन्नईच्या पोस गार्डन येथील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्याच्यावर आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दावा केला की त्यांनी आपली मालमत्ता 188 कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते, परंतु तपासणीत त्याची एकूण मालमत्ता सुमारे 900 कोटी रुपये असल्याचे आढळून आले.  

9/10

जयललिता त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहिल्या. शोभन बाबू यांच्याशिवाय त्यांचं नाव एमजीआर यांच्यासोबतही जोडलं गेले. असे म्हटले जाते की त्यांच्याशी लग्न करायचं होतं. परंतु एमजीआर आधीच विवाहित होते आणि ते त्यांना कधीही पत्नीचा दर्जा देऊ शकले नाहीत.   

10/10

जयललिता यांच्या लग्नाबाबतही अशा अनेक अफवा समोर आल्या होत्या. लग्न आणि प्रेमाशी संबंधित त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांनी कधीही लग्न केले नसले तरी भाचा सुधाकरन याला दत्तक घेऊन आयुष्यात आईची भूमिका साकारली.