'ॲनिमल- सॅम बहादुर', 'डंकी- सालार' बॉक्स ऑफिसवर एकत्र धडकणार 'हे' चित्रपट

यंदाच्या वर्षी मोठ्या पडद्यावर सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'OMG 2' हे चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एकाच दिवशी दोनही चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जर असं शक्य आहे तर आणखी असे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर... आता एकाच दिवशी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ते कोणते ते जाणून घेऊया...

| Oct 02, 2023, 16:34 PM IST
1/7

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफचा 'गणपत : पार्ट वन' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयचा 'लीओ' हे एकाच दिवशी नाही तर एक दिवस मागे-पुढे असे प्रदर्शित होणार आहे.   

2/7

थलपती विजय

'लीओ' हा 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे, तर 'गणपत : पार्ट वन' हा 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.

3/7

विकी कौशल आणि रणबीर कपूर

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' आणि रणबीर कपूरचा 'एनिमल' हे दोनही चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. बॉलिवूडचे दोन लोकप्रिय कलाकार एकाच दिवशी चाहत्याच्या भेटीला येणार आहे.

4/7

कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा

कतरिना कैफचा 'मेरी क्रिसमस' आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

5/7

मेरी क्रिसमस

'मेरी क्रिसमस' या चित्रपटात कतरिना कैफसोबत विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

6/7

शाहरुख आणि प्रभास

शाहरुख खानचा 'डंकी' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हे दोन्ही चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत.   

7/7

अजय देवगण आणि अल्लू अर्जुन

अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हे दोन्ही चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. (All Photo Credit : Social Media)