मिनिटामिनिटाला घाबरवणारा भयपट; भीतीचा कडेलोट करणाऱ्या या चित्रपटाचं नाव काय?

हा चित्रपटही असाच एक. OTT वर असणारा हा चित्रपट पाहायलाच लागतोय... प्रत्येक दृश्य पाहून वाटेत तिथं कुणीतरी आहे.... 

Sep 30, 2024, 14:00 PM IST

Most Scariest South Movie: कलाजगतामध्ये विविध विषयांवर आणि विविध संदर्भांवर आधारित अनेक चित्रपट साकारले जातात. अशा या चित्रपटांच्या यादीतील काही नावं अशी, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्यच. 

 

1/7

भयपट

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

Most Scariest South Movie: जेव्हाजेव्हा भयपटाचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हातेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांचाही उल्लेख होतो. दाक्षिणात्य भयपटांमधील बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या मनात त्या कलाकृतीप्रतीचं कुतूहल टिकवून ठेवतात. 

2/7

थरकाप

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

असाच एक चित्रपट इतका जास्त घाबरवणारा आहे, की त्यातील प्रत्येक Scene थरकाप उडवतो. 2023 या वर्षात दमदार कमाई करणारा हा चित्रपट एकट्यानं पाहूच नका असं अनेकजण म्हणतात. या चित्रपटाचं नाव आहे, 'विरुपाक्ष'.   

3/7

कथानक

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

चित्रपटाच्या स्टारकास्टपासून कथानकापर्यंत अनेक गोष्टी प्रशंसनीय असून, कार्तिक दांडू यांच्या दिग्दर्शनात ही कलाकृती साकारण्यात आली आहे.   

4/7

दृश्य

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

साई धर्म तेज, संयुक्ता मेनन यांसारख्या कलाकांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटामध्ये अशी अनेक दृश्य आहेत, जी पाहून अंगावर काटाच उभा राहतो.   

5/7

चित्रपट

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

गावात होणाऱ्या विचित्र प्रकारच्या मृत्यूंभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. एक गुढ रहस्य, ते सोडवण्यासाठीची धडपड आणि त्यातून उलगडणारं कथानक अशी एकंदर या चित्रपटाची बांधणी.   

6/7

ओटीटी

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

103 कोटी रुपये इतकी कमाई केलेल्या या चित्रपटानं सिनेमागृहात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याचाच डंका वाजत आहे.   

7/7

रेटिंग

2023 Biggest Horror Movie Virupaksha on OTT Netflix

नेटफ्लिक्सवर IMDb कडून कमाल रेटिंग मिळालेला हा चित्रपट तुम्ही हिंदी भाषेतही पाहू शकता. हो, पण भयपटानं धडकी उडत असल्यास मात्र हा चित्रपट पाहणं टाळा.