IPL 2021: सामना जिंकूनही संजू सॅमसनला का बसला मोठा फटका?

राजस्थानने सामना जरी जिंकला असला तरीही एक मोठा फटका राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला बसला आहे. 

Updated: Sep 22, 2021, 08:18 AM IST
IPL 2021: सामना जिंकूनही संजू सॅमसनला का बसला मोठा फटका? title=

दुबई : आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरु झाला असून मंगळवारी पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. यावेळी राजस्थानने पंजाबवर अवघ्या 2 रन्सनी विजय मिळवला. राजस्थानने सामना जरी जिंकला असला तरीही एक मोठा फटका राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला बसला आहे. 

पंजाबवर विजय मिळून देखील राजस्थान रॉयल्सच्या संघाला मोठी फटका बसला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड सॅमसनला भरावा लागणार आहे. सामना संपल्यानंतर आयपीएल व्यवस्थापनाने माहिती दिली की, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण न केल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

स्लो ओव्हर प्रकरणी संजू सॅमसनला मोठा दंड भरावा लागेल मात्र सामना जिंकल्यामुळे  संजू सॅमसनचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 

शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 4 धावांची गरज होती. अशामध्ये कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर पूरन 32 धावांवर आऊट झाला. यानंतर त्यागीने टाकलेल्या बॉलवर पंजाबला रन काढता आला नाही. पुढच्या चेंडूवर त्याने दीपक हुडाला कॅटआऊट केलं. एका बॉलमध्ये 3 रन्सची गरज असताना त्यागीने फॅबियन एलनला रन काढू दिला नाही आणि राजस्थानने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तर आज केन विलियम्सनची सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने असणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबादला नमवून गुणतालिकेत टॉपला जाणार का की यंदाच्या स्पर्धेत सनरायझर्स दुसरा सामना जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.