आमच्यासाठी सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुलेच शिक्षणाची देवता- छगन भुजबळ

या सरस्वतीनं आम्हाला पाच हजार वर्षे का शिकू दिले नाही?

Updated: Dec 9, 2018, 07:58 PM IST
आमच्यासाठी सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुलेच शिक्षणाची देवता- छगन भुजबळ title=

नाशिक: विद्येची देवता म्हणून सरसस्वी देवीची उपासन केली जाते. मात्र, या सरस्वतीनं आम्हाला पाच हजार वर्षे का शिकून दिले नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विचारला. ते रविवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. मात्र, ज्या सरस्वतीला आम्ही कधी बघितलंच नाही, तिचे विद्येची देवता म्हणून सगळीकडे पूजन होते. या सरस्वतीनं आम्हाला पाच हजार वर्षे का शिकू दिले नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आमच्यासाठी शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुलेच आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले. 
 
 यावेळी भुजबळ यांनी भाजप सरकारवही हल्ला चढवला. भाजपला केवळ ३३ कोटी देव आणि त्यांच्या आरक्षणाची काळजी असल्याची टीका त्यांनी केली.  छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.