'या' पक्षाने उडवलेय एकनाथ खडसेंची झोप

गेल्या काही दिवसांपासून आणखी एका कारणामुळे एकनाथ खडसेंची झोप उडाली आहे.

Updated: Jul 15, 2018, 10:56 PM IST
'या' पक्षाने उडवलेय एकनाथ खडसेंची झोप title=

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील आरोपांचा धुरळा आता बऱ्यापैकी खाली बसला आहे. त्यामुळे खडसेंना हायसे वाटणे साहजिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आणखी एका कारणामुळे एकनाथ खडसेंची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे खडसेंची झोप कोणा व्यक्तीने नव्हे तर एका पक्षाने उडवली आहे. 

सध्या खडसेंच्या घराच्या परिसरात हॉर्नबिल पक्षांनी घरटे बनवले आहे. हे पक्षी रोज पहाटे खडसेंच्या बेडरूमच्या खिडकीजवळ येऊन बंद असलेल्या काचेवर चोच आपटत बसतात. त्यामुळे एरवी सात वाजता उठणाऱ्या खडसेंना पाच-सहा वाजताच उठावे लागत आहे. 

आता याचा त्रास होत असला तरी खडसे त्याबाबत फारसे नाराज नाहीत. आम्ही पहिल्यांदाच याठिकाणी हे पक्षी बघितले आहेत. ते रोज सकाळी येऊन खिडकीवर चोच आपटत बसतात. त्यामुळे मला नाईलाजाने उठावेच लागते, अशी काहीशी लाडिक तक्रार खडसेंनी केली.