'त्या' पत्रामुळे मोक्का न्यायालयाच्या वकीलाला ठार मारण्याचा कट उघड

कैद्याच्या या पत्राची पोलीस महासंचालकांनीही गंभीर दखल घेतली आहे.

Updated: Jul 13, 2018, 06:26 PM IST
'त्या' पत्रामुळे मोक्का न्यायालयाच्या वकीलाला ठार मारण्याचा कट उघड title=

नाशिक: मोक्का न्यायालयाचे वकील आणि विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात हा कट शिजत होता. कारागृहातील मोक्का बराकीत कैद्यांसाठीच्या तक्रारपेटीत या कटाबाबतचं पत्र कारागृह प्रशासनाच्या हाती लागले. त्यानंतर या सर्वाचा उलगडा झाला. त्यामुळे अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

कैद्याच्या या पत्राची पोलीस महासंचालकांनीही गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तांना शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेत. मोक्काचे दावे विशेष सरकारी वकील अजय मिसर लढवतात. ते आहेत तोवर आपली सुटका होण्याची शक्यता नाही, म्हणून मिसर यांना ठार मारण्यासंदर्भातील चर्चेला उल्लेख या पत्रात आहे.