नाशिक : धरणाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा प्रसिद्ध असला तरी यंदा परिस्थिती बिकट बनलीय. जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर काही भागात अतिवृष्टी झालीय. टंचाईग्रस्त भागात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रसार होऊ लागलाय. स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळं जिल्ह्यात पाच जणांचा नाहक बळी गेलाय.
नाशिक जिल्ह्यात अद्याप ६७ गावं आणि ८६ वाड्या तहानलेल्या असून त्यांना ५१ टँकरने आजही पाणी पुरवठा केला जातोय.
मुंबईसह राज्यातील लहान सहकारी गृहनिर्माण संस्थांना सरकारचा दिलासा किचकट निवडणूक प्रक्रियेतून लहान सहकारी गृहनिर्माण संस्थांची सुटका झालीय. १०० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था सर्वसाधारण सभेत निवडणूक घेऊ शकतात. १०० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक सहकार निवडणूक आयोगामार्फत होणार नाहीत. अशा लहान सहकारी गृहनिर्माण संस्था स्वतः निवडणूक घेऊ शकतात. राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय.