कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक; गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले आहे. या कारावईनंतर गौतमीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

वनिता कांबळे | Updated: May 3, 2023, 11:31 PM IST
कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक; गौतमी पाटीलची प्रतिक्रिया title=

Gautami Patil Viral Video: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले आहे. या कारावईनंतर गौतमीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

सबसे कातील, गौतमी पाटील... आपल्या नृत्यानं लाखो तरूणांना घायाळ करणारी गौतमी पाटील जिकडे तिकडे चर्चेचा विषय बनलीय.  काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. गौतमी पाटील कपडे बदलतानाचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी नगरमधून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या व्हिडिओमुळे गौतमीही व्यथित झाली होती. गौतमीनं पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  अहमदनगरच्या श्रीगोंदा येथून या अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कधी कार्यक्रमामुळे, कधी तिच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे तर कधी तिच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. गौतमीच्या नृत्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यातून अल्पवयीन आरोपीला अटक केलीय. मात्र या प्रकरणातला अजून एक आरोपी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

आरोपीला अटक केल्यानंतर गौतमीची प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतल्याने गौतमी पाटील हिने समाधान व्यक्त केलं आहे. एका सामाजिक कार्यासाठी ठेवण्यात आलेल्या शोसाठी गौतमी पाटील श्रीगोंदा शहरात आली होती. श्रीगोंदा येथूनच व्हिडिओ व्हायरल करणारा मुलगा ताब्यात घेण्यात आले आहे. आपला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होत आहे.  व्हिडिओ व्हायरल करणारे आणखी काही लोक बाहेर आहेत. मात्र, तेही काही दिवसात पकडले जातील अशी खात्री देखील गौतमीने व्यक्त केली आहे.