सरकारी रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली; आता करावी लागणार DNA टेस्ट

जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. 

वनिता कांबळे | Updated: May 3, 2023, 11:05 PM IST
सरकारी रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली; आता करावी लागणार DNA टेस्ट  title=

Jalgaon News :  सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्मांची हेळसांड झाल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.   दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाल्याेन हा गोंदळ झाला आहे.  डीएनए टेस्ट करून बाळांना मुळ पालकांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याया प्रकारामुळे सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमेतवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. 

ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. अखेर आता कुणाचं कुठलं बाळ हे ठरवण्यासाठी बाळांची आणि पालकांची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. तोपर्यंत बाळं हॉस्पिटलमध्येच राहणार आहेत. 

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवजात बालकांची अदलाबदल झाल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. यात मात्र नवजात बालकांचे खरे पालक शोधण्यासाठी आरोग्य प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बालकांची अदलाबदल झाल्याचे खरे पालक कोण हे ठरविण्यासाठी आता प्रकरण पोलीस स्थानकात पोहचले आहे. आता डी एन ए टेस्ट वरून बालकांचे खरे पालक ठरणार आहे.

नेमका काय आहे प्रकार?

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला असून या प्रकारामुळे दोन्हीही बालकांचे नातेवाईक मात्र चांगलेच आक्रमक झाले होते. दोन गर्भवती महिलांची प्रकृती एकाच वेळी खालवल्याने दोनही महिलांची तात्काळ प्रस्तुती करण्यात आली.  पाच मिनिटांच्या अंतराने एका महिलेला मुलगा तर एका महिलेला मुलगी झाली . मात्र नवजात शिशु पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिका यांच्याकडून नवजात बालक अदलाबदलीचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात एकच गोंधळ उडाला.

याप्रकरणी एका नवजात बालकाच्या पालकांनी थेट जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी आता दोन्ही बालकांचे डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट वरून या बालकांचे आता पालक कोण आहेत हे स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकारामुळे जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभार हा चव्हाट्यावर आला आहे.