धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा

कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule-Nandurbar local body constituency) मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections ) पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.  

Updated: Nov 18, 2020, 02:35 PM IST
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule-Nandurbar local body constituency) मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections ) पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलला ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता येत्या १ डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. निवडणूक स्थगित झाली तेव्हा भाजपतर्फे (BJP) अमरीश पटेल (Amrish Patel) यांनी, तर काँग्रेसकडून (Congress) अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. याच दोघा उमेदवारांमध्ये आता निवडणूक होणार आहे.

अमरीश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे. तर काँग्रेससाठीही महत्वाची आहे. कारण सध्या काँग्रेस सत्तेत आहे. तर भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच चर्चा आहे.