'आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा...

‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ... कुठलाही भव्य जलाशय नसतानाही देहास सचैल स्नान घालणारं आमचं शक्तीपीठ - श्री क्षेत्र आंगणेवाडी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 13, 2013, 03:58 PM IST

ऋषी श्रीकांत देसाई, झी २४ तास, वृत्तनिवेदक
गोष्ट अवघ्या दोन-तीन दिवसापूर्वीची... माझ्या ‘प्राईम वॉच’ या शोचं अँकरिंग करत होतो. विषय होता – धार्मिक सोहळ्यातली गर्दी आणि झुंबड... ‘अलाहाबाद महाकुंभ’वर विशेष कार्यक्रम सुरु होता. चर्चेसाठी मान्यवर म्हणून नाशिकमधून एका आखाड्याचे प्रमुख होते, पुण्याहून वारकरी होते आणि अलाहाबादहून एका आखाड्याचे साधू बसले होते... लाईव्हसाठी दणकट पॅनेल होतं... चर्चा जोरदार होती.. हिंदू धर्म सण, संस्कृती याचा जर आपण नीट अभ्यास केला तर त्या सगळ्यात एक समाजाशी असेलेली कनेक्टिव्हिटी दिसते आणि म्हणूनच यात्रांचा अभ्यास करताना गर्दीचं नियोजन आणि त्यात धार्मिकपणाला कुठेही धक्का न लागणं या दोन गोष्टी अतिशय काटेकोरपणे कराव्या लागणं, याच विषयावर सगळे पाहुणे बोलत होते. शो खूप चांगला झाला... स्टुडिओतली लाईट ऑफ झाली... पण गेली अर्धा तास झडलेली चर्चा मला काहीतरी खुणावत होती... कुठलातरी एक आदर्श वस्तुपाठ होता, तोच मनात घोळत होता... काय ते नेमकं कळत नव्हतं आणि त्याचवेळी ‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ... कुठलाही भव्य जलाशय नसतानाही देहास सचैल स्नान घालणारं आमचं शक्तीपीठ - श्री क्षेत्र आंगणेवाडी... महाराष्ट्रातल्या संत पंरपरेनं ज्या शक्तीपीठांची आस मराठी मनावर गोंदली, त्याच शक्तीस्थळाचं कोकणची काशी म्हणून आमच्या पिढीनं मनोमन पुजलं... असं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र आंगणेवाडी.. एव्हढंच काय पण कुठल्याही महिन्यात जिथं गेल्यावर स्वता:चे डोळेच ज्या जत्रेच्या आठवणी आजुबाजूच्या शेतमळ्यात शोधतात ते ठिकाण म्हणजे अर्थात ‘श्री क्षेत्र आंगणेवाडी’.
शोध चैतन्याचा
आंगणेवाडी म्हटलं तर छोटसं टुमदार गाव, आणि म्हटलं तर अवघ्या कोकणाला उरलेलं ३६४ दिवस जगण्याची अविरत ऊर्जा देणारं एक शक्तीपीठ... या गावात, जत्रेत असं नेमकं काय आहे मला अजूनही नाही कळालं.. पण या सगळ्या उत्साहाला श्रध्देचा आयाम मात्र नक्की आहे. तो नजरेला दिसत असूनही चौकटीत नाही पकडता येत, हे मात्र नक्की... कारण या सगळ्या गोष्टी शोधता शोधता आपणचं त्या चक्रात गुरफटून जातो आणि या सगळ्या प्रचंड गर्दीत मिसळल्यावर आपणच आपला शोध घेतो. समोर माणसं असूनही काहीच दिसत नसतं. प्रचंड कोलाहलात एक गोष्ट मात्र शाश्वत असते ती म्हणजे रंगीबेरंगी प्रकाशानं न्हावून निघालेला आई भराडीच्या मंदिराचा सोनेरी कळस... पायपीट करुन पंढरीला गेल्यावर निम्म्याहून जास्त भाविक केवळ कळसाचं दर्शन करुन मागे कसे येऊ शकतात? या माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मलाच आंगणेवाडीच्या जत्रेत गेल्यावर कळलं. अनेकासाठी गाभाऱ्यातलं मूक दर्शनाएवढाच जत्रेच्या दिवशी कळसाला केलेलं भक्तीभावाचं वंदनही तेवढचं श्रध्दावान असतं.
पारंपरिक सोशल मीडिया
माझ्या लहानपणापासून ही जत्रा मी पाहिलीय, अनेक लेखांत वाचलीय... पण दरवर्षी असणारी ही जत्रा रिपीट कधीच होत नाही. कारण एवढ्या सगळ्या माणसांनी भरलेल्या या जत्रेत दरवेळेला एक नवा उत्साह असतो आणि हा सगळा उत्साह जत्रेच्या सगळ्या प्रक्रियेतचं असतो. खरंतर जत्रेची तारीख ही ‘पारध’ झाल्यावर मग कौल लावून ठरते आणि त्यानंतर जत्रेची तारीख ठरवली जाते. काही वर्षापूर्वीचा विचार केला तर त्यावेळी सोशल मीडिया अॅक्टिव्ह की ब्रेकींग न्यूजचा माराही नव्हता. ज्यांना हा प्रकार माहीत नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आज रंजक ठरेल. जत्रेची तारीख ठरली की जणू काही निर्जीव असणाऱ्या खडूमध्येही रंग चढायचे... प्रत्येक ग्रामपंचायतीवर, चौकामध्ये असणाऱ्या निर्जीव सूचना फलकात प्राण भरायचा, लाल डबा म्हणून बोलल्या जाणाऱ्या पण प्रत्येक मालवण माणसाच्या हक्काची ‘येसटी’ तेव्हा एशियाड वाटायची, झाक-झूक रिक्षाही पॉश वाटायची... कारण या सगळ्या गोष्टींवर उमटलो जायची ती फक्त एक गोष्ट... आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख. आज आपण फेसबुकच्या प्रचंड आहारी गेलोय. त्याच भाषेत सागांयच तर कोणतरी तुमच्या वॉलवर जत्रेची पोस्ट टाकायची आणि सगळ्यानी ती नुसती लाईक नाही तर शेअर करायची. माझ्या मालवणी माणसानी फक्त जत्रेसाठी बनवलेली ती सोशल कनेक्टिव्हिटी आजही प्रचंड कूतुहलाचा विषय आहे. एरव्ही आपल्या वाहनावर विनापरवाना काहीही केलं म्हणून थेट हमरी-तुमरीवर येणारे वाहनचालक आजही या जत्रेच्या तारखेच्या जाहीरातीवरुन मात्र देवीची काम म्हणून अभिमानानं आपल्या वाहनावर मिरवतात ह