यू-ट्युब, टाटा डोकोमोची भागीदारी, आता 9 रुपयांत पाहा व्हिडिओ

यू-ट्युबने टाटा डोकोमोसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमध्ये दुरसंचार सेवा कंपनीचे 3जी प्रीपेड ग्राहक 9 रुपयांत ऑनलाईन व्हिडिओ बघू शकणार आहेत. 

Updated: Jul 9, 2014, 08:12 AM IST
यू-ट्युब, टाटा डोकोमोची भागीदारी, आता 9 रुपयांत पाहा व्हिडिओ  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : यू-ट्युबने टाटा डोकोमोसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमध्ये दुरसंचार सेवा कंपनीचे 3जी प्रीपेड ग्राहक 9 रुपयांत ऑनलाईन व्हिडिओ बघू शकणार आहेत. 

यू-ट्युब, अपालया टेक्नॉलॉजी आणि टाटा डोकोमो व्हिडिओ डेटा प्लान 'यू ट्युब रिजार्च' सादर करणार आहे. या रिचार्जमुळे ग्राहक ऑनलाईन व्हिडिओ बघण्यासाठी नियमितपणे करत असलेल्या इंटरनेट किंमतीच्या तुलनेत 50 टक्के सूट मिळणार आहे. 

या रिचार्जमुळे ग्राहक 9 रुपयांत 100 एमबी असलेला व्हिडिओ बघू शकतो. त्याचा कालावधी 24 तास असणार आहे. 

यूट्युबचे संचालक गौतम आनंद यांनी सांगितले की, 'हा प्रकल्प ग्राहकांना व्हिडिओ स्वस्त दरात बघता यावा, म्हणून हा प्रयत्न केला आहे. आमच्यासाठी ही पहिलीच भागीदारी आहे'.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.