मायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात

भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते. 

Updated: Jul 7, 2014, 07:44 PM IST
मायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात title=
फाईल फोटो

नवी दिल्ली: भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते. 

वैशिष्ट्ये - 
स्क्रिन ५ इंच 
१.३ जीएचझेड डुअल क्वोर मीडिया टेक एमटी ६५७२ प्रोसेसर 
५ मेगापिक्सेल कॅमरा- एलईडी फ्लॅश 
०.3 फ्रन्ट कॅमेरा
५१२ रॅम
४ जीबी इंटरनल स्टोरेज
१८०० एमएएच बॅटरी जी ७ तास टॉकटाईम आणि २१० तासांचे स्टॅंडबाय टाईम 

तसंच २जी, वाय-फाय, ब्लूटुथ, एफएम रेडिओ, ३.५ ऑडिओ जॅक ही उपलब्ध आहेत. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि याची किंमत ऑनलाईन रिटेलर ईबे वर ५,३०१ रुपये आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.