मुंबई : चायना मेड शाओमी फोनने मोबाईल जगतात ड्रॅगन भरारी घेतली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वर 'शाओमी मी-3' हा फोन अवघ्या पाच सेकंदात 'ऑऊट ऑफ स्टॉक' झाला आहे.
शाओमीचे 20 हजार फोन अवघ्या पाच सेकंदात विकले गेले आहेत. शाओमीला चीनचा ऍपल फोनही म्हणतात.
शाओमीचं भारतातलं मुख्य कार्यालय बंगळुरूमध्ये आहे. भारतात शाओमीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने भारतातील शाओमीचे उपाध्यक्ष हुगो बारा यांनी म्हटलंय.
सुरूवातीला या फोनला चायना मेड म्हणून हिनवलं गेलं, मात्र लोकांनी याला खिशात मिरवणं पसंत केलंय.
'शाओमी मी-थ्री'ची वैशिष्ट्ये
1) पाच इंचाची स्क्रिन
2) दोन जीबी रॅम, १६/६४ जीबी इंटरनल मेमरी
3) १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सल द्वितीय कॅमरा
4) अँड्राईड ४.३ (जेलीबीन)
5) किंमत- १३,९९९ रु.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.