संशोधन म्हणतं, कमी कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान...

जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा सर्वात प्रथम समोरचा न्याहाळतो ती तुमची पर्सनॅलिटी... तुमच्या बुद्धीचा नंबर नंतर लागतो... आणि ही गोष्टी महिला आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. 

Updated: May 4, 2016, 05:57 PM IST
संशोधन म्हणतं, कमी कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान... title=

नवी दिल्ली : जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा सर्वात प्रथम समोरचा न्याहाळतो ती तुमची पर्सनॅलिटी... तुमच्या बुद्धीचा नंबर नंतर लागतो... आणि ही गोष्टी महिला आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात महिलांसंदर्भात एक चकीत करणारी माहिती समोर आलीय. या संशोधनानुसार, ज्या महिला कमीत कमी कपडे परिधान करतात त्यांना संपूर्ण कपडे वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान समजलं जातं. 

बुचकळ्यात टाकणारं सत्य

हे संशोधन संपूर्णत: दिखाव्यावर आणि समोरच्या व्यक्तीच्या आकलन बुद्धीवर अवलंबून आहे. परंतु, तुम्ही कमी कपडे घातले तर तुम्हाला अधित समजूतदार, अधिक बुद्धीमान समजलं जातं ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे.

कसं करण्यात आलं हे संशोधन

या संशोधनासाठी पदवीचं शिक्षण घेणाऱ्या ६४ जणांना सहभागी करून घेण्यात आलं. त्यांनी केलेल्या विश्लेषणावरून या संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आले. यावेळी त्यांना काही महिलांचा फोटो दोन सेटमध्ये दाखवण्यात आले. यातील एका सेटमध्ये महिलांनी छोटे टॉप, जॅकेट आणि छोटे स्कर्ट परिधान केले होते. तर दुसऱ्या सेटमधल्या महिलांनी लांब स्कर्ट आणि शरीर संपूर्णत: झाकणारे कपडे परिधान केले होते. 

यानंतर या विद्यार्थ्यांना नोकरी, नैतिकता, प्रामाणिकपण, पर्सनॅलिटी, सेक्स आणि आकर्षण आणि बुद्धीमानता यांवर या मुलींना गुणांक देण्यास सांगितलं गेलं. यामध्ये, छोटे कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान असल्याचं समजण्यात येतं, असं समोर आलंय. 

अर्थातच, समोरच्याच्या दृष्टीकोनातून केवळ दिखाव्याच्या आधारावर केलं गेलेलं हे संशोधन आहे. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा.