मुंबई : प्रत्येक पुरुषाला हा एक प्रश्न असेल की महिलांना कसे पुरूष आवडतात. तर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांना कसे पुरुष आवडतात.
या 5 गोष्टी पुरुषामध्ये असाव्यात :
१. आत्मविश्वास : ज्या व्यक्तींमध्ये खूप आत्मविश्वास असतो ज्याच्या जोरावर ते दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि दुसरा काय करतोय यापेक्षा मला काय करायचंय हे ज्याला माहित असतं असा पुरुष महिलांना आवडतो.
समजदार : जे पुरुष खूप समजदार असतात आणि ज्यांच्याकडे बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असतं अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात. जो पुरुष सर्वच बाजूंनी सक्षम असेल अशा पुरुषासोबत महिलांना सुरक्षित असल्याचं वाटतं म्हणून स्त्रीया अशा पुरुषांकडे आकर्षित होतात.
रोमँटिक : पहिल्या भेटीतच जे पुरुष महिलांवर स्वत:ची छाप सोडून जातात अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात. कविता करणं, शायरी म्हणणं, गिफ्ट देणं, फुल देणं अशा गोष्टीतून जो व्यक्ती त्याचं प्रेम दर्शवत असतो असा रोमँटिक पुरुष महिलांना आवडतो.
विशेष लक्ष देणारा : कारचा दरवाजा ओपन करुन बसण्यासाठी ऑफर करणं, हॉटेलमध्ये गेल्यावर प्रथम बिल भरणं, कोणतीही गोष्ट आधीच करुण टाकणं असे फास्ट आणि या गोष्टींकडे विशेष लक्ष देणारे पुरुष महिलांना आवडतात.
फोर्स न करणारा : कोणत्याही गोष्टीसाठी स्त्रीला जबरदस्ती न करणारा जसे की फोन केल्यावर ती महिला व्यस्त असल्यास नंतर कॉल करणं. त्या महिलेने आताच बोललं पाहिजे असा आग्रह न धरणारा. समजून घेणारा पुरुष महिलांना अधिक आवडतो.