'हाईक मॅसेंजर'ने करा मोफत कॉल

इंटरनेवरून फ्री कॉलिंगचं आकर्षण सध्या वाढत जातंय. कधी-कधी आवाज व्यवस्थित ऐकू येत नसला, तरी कमी पैशात आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याने नेट फ्री कॉलिंगला पसंती देण्यात येत आहे.

Updated: Jan 29, 2015, 09:02 AM IST
'हाईक मॅसेंजर'ने करा मोफत कॉल title=

मुंबई : इंटरनेवरून फ्री कॉलिंगचं आकर्षण सध्या वाढत जातंय. कधी-कधी आवाज व्यवस्थित ऐकू येत नसला, तरी कमी पैशात आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याने नेट फ्री कॉलिंगला पसंती देण्यात येत आहे.

हेच टायमिंग आता हाईकने साधण्याचा प्रयत्न केला आहे. हाईक हे भारतीय चॅट अॅप्लिकेशन आहे. हाईक मॅसेंजरने बुधवारपासून युझर्सना मोफत व्हाईस कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरूवातीला २०० देशांमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे.

टूजी, थ्रीजी तसेच वायफाय नेटवर्कवरून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
हाईकचे हे फ्री व्हाईस कॉलिंग फिचर सध्या केवळ अँड्राईड युझर्ससाठी असलं, तरी एप्रिलपर्यंत आयओएस आणि विंडोज युझर्ससाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.