मुंबई: कोणत्याही प्रकारच्या तारेविना फोन चार्ज करणं अतिशय सोयीयुक्त असतं, असंच सर्वांना वाटतं. पण असं नाहीय. जेव्हा आपण फोन चार्ज करण्यासाठी लावतो. तेव्हा फोनचं चार्जिंग कॉईल आणि चार्जरचं कॉईल मिळणं गरजेचं असतं. ते थोडंही हललं तर फोन चार्ज होणं थांबतं.
गूगलच्या नेक्सस-6 फोन वापरणाऱ्यांना हा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. तर काही वायरलेस चार्जर पाहून वाटतं की ही टेक्नॉलॉजी ग्राहकांच्या सुविधेसाठी बनवली गेलीय. पण तीच आता डोकेदुखी ठरतेय.
किंमत
अँड्रॉयडसेंट्रल डॉट कॉमच्या मते क्रॅडलवाले वायरलेस चार्जर सर्वाधिक आरामदायक आहेत.
आपण असंच चार्जर विकत घ्या ज्यात जास्त कॉईल असतील. हे चार्जर बनवतांना लक्ष दिलं जातं की कोणत्याही एकातरी कॉईलमुळे सतत चार्जिंग होत राहील. ज्यामुळं मोठे स्क्रीनवाले फोन आणि टॅबलेटचं चार्जिंग सोपी होईल.
म्हणून हे पोर्टेबल चार्जर विकत घेतांना आपण ते नीट घेतलंय की नाही, हे जरूर चेक करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.