तुमची 'आवड' फेसबुक झटक्यात ओळखणार!

तुम्ही फेसबुकवर एखादी अॅक्टिव्हिटी करो अथवा न करो 'फेसबुक'ला मात्र यापुढे हे माहीत असेलच की तुमच्या फीडमध्ये दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतील की नाही.

Updated: Jun 16, 2015, 03:36 PM IST
तुमची 'आवड' फेसबुक झटक्यात ओळखणार! title=

न्यूयॉर्क : तुम्ही फेसबुकवर एखादी अॅक्टिव्हिटी करो अथवा न करो 'फेसबुक'ला मात्र यापुढे हे माहीत असेलच की तुमच्या फीडमध्ये दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतील की नाही.

आपल्या फेसबुक फीडमध्ये आपण ज्या गोष्टींना 'लाईक' करतो, कमेंट करतो किंवा शेअर करतो त्या दिसतात, हे तर एव्हाना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. यालाच आपण अनुनाद प्रभाव अर्थात इको इफेक्ट म्हणतो. पण, फेसबुकवर आपल्या समोर येणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला पसंत पडतील किंवा आपण त्या शेअर करूच असंही नाही.

फेसबुक आपल्या प्रणालीत सध्या सुधारणा करत आहे. यामुळे, तुम्ही तुमच्या फीडमध्ये उपस्थित असलेल्या एखाद्या पोस्टवर किती वेळ व्यतीत करत आहात... याची माहिती फेसबुकला लगेचच मिळेल. मग ती पोस्ट तुम्ही लाईक करा, शेअर किंवा कमेंट करा अथवा करू नका...  

जसं तुम्ही एखाद्या पोस्टवर काही क्षणांसाठीही थांबाल, फेसबुकचं 'टायमर' अप्रत्यक्ष पद्धतीनं सुरू होतं. जर तुम्ही एखाद्या पोस्टवर फोटो पाहणं किंवा कमेंट वाचण्यासाठी काही क्षण खर्ची घातले तर फेसबुक याच संकेताला तुमची 'आवड' समजेल. यामुळे, तुमच्या कोणत्याही अॅक्टिव्हिटीविनाच फेसबुकला तुमच्या आवडी-निवडी समजतील.

येणाऱ्या काही आठवड्यांत अल्गोरिदम परिवर्तन सुरू होईल, असं फेसबुकनं म्हटलंय. परंतु, यामुळे तुमच्या न्यूज फीडमध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.