व्हाट्सअॅपवरुन ५० जणांची जमावबंदी हटवली

सध्या आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपवरुन ५० जणांच्या ग्रुप जमावबंदी हटली आहे. त्यामुळे तुम्हाला आता अधिकचे मित्र आपल्या ग्रुपवर नव्याने करता येणार आहे.

Updated: Nov 13, 2014, 10:54 PM IST
व्हाट्सअॅपवरुन ५० जणांची जमावबंदी हटवली title=

मुंबई : सध्या आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपवरुन ५० जणांच्या ग्रुप जमावबंदी हटली आहे. त्यामुळे तुम्हाला आता अधिकचे मित्र आपल्या ग्रुपवर नव्याने करता येणार आहे.

व्हाट्सअॅपने ५० वरुन १०० पर्यंत संख्या नेली आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक मित्र आपल्या ग्रुपमध्ये आता अॅड करता येणार आहे. याआधी व्हाट्सअॅपने मित्रांने मेसेज वाचला आहे की नाही तेही समजण्याची पद्धत सुरु केली. निळ्या रंगामध्ये दोन टीक अशी खूण या अॅपमध्ये सुरु केली. त्यानंतर आता १०० जणांचा ग्रुप अशी संख्या केली आहे. त्यामुळे व्हाट्सअॅपने आपले युजर्स वाढविण्याचा नवा फंडा उपयोगात आणल्याचे दिसत आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप युझर्ससाठी आता मेसेज पाठवणं आणि साठवणं अधिक सोपं झालं आहे. व्हॉट्सअॅप मेसेजमधील तांत्रिक गडबडींमुळे अनेकदा मेसेजेस डिलीट होण्याची तक्रार ऐकाला मिळतात. पण व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळं हा त्रास आता कमी होणार आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅपच्या युझर्ससाठी ही नक्कीच चांगली बातमी म्हणता येईल.

व्हॉटअॅपवरील आपल्या आठवणीतले अनेक जुने मॅसेज, फोटोज आणि व्हिडिओज डिलीट होऊन जात होते. पण या नव्या अपडेटमुळं तुमच्या या समस्येला उपाय शोधला गेला आहे. व्हॉट्सअॅपवर आता अॅपला तुमच्या मोबाईलमध्ये बॅकअपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅपमधील तुमचे सर्व मेसेजेस, फोटोज आणि व्हिडीओसाठी तुम्हाला बॅकअॅप घेता येणार आहे.

पण तुम्ही व्हॉट्सअॅप कोणत्या मोबाईलवर वापरता त्यानुसार त्याची पद्धत वेगळवेगळी असणार आहे. कारण अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही ओएससाठी व्हॉट्सअॅपने बॅकअपची वेगवेगळी पद्धत देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.