व्हॉट्स अॅपनं भारतात व्हॉइस कॉलिंग फीचर केलं लॉन्च

व्हॉट्स अॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी. हाइक नंतर आता व्हॉट्स अॅपनं सुद्धा आपलं व्हॉइस कॉलिंग फीचर लॉन्च केलंय. 

Updated: Feb 2, 2015, 08:44 AM IST
व्हॉट्स अॅपनं भारतात व्हॉइस कॉलिंग फीचर केलं लॉन्च title=

नवी दिल्ली: व्हॉट्स अॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी. हाइक नंतर आता व्हॉट्स अॅपनं सुद्धा आपलं व्हॉइस कॉलिंग फीचर लॉन्च केलंय. 

अॅपच्या कॉलिंग फीचरचं एक स्क्रीनशॉट समोर आलाय. सध्या फक्त चाचणीच्या पातळीवर सुरू असलेली ही सुविधा लवकरच सर्वाच व्हॉट्स अॅप सबस्क्रायबर्सना मिळणार आहे. 

व्हॉट्स अॅपने अजून याबाबत काही अधिकृत माहिती प्रसारित केली नसली तरी काही मर्यादित ग्राहकांना व्हाईस कॉलिंगची सुविधा चाचणीसाठी उपलब्ध करून दिलीय.

सध्या फक्त अँड्राईड स्मार्टफोन धारकांसाठीच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय. आयफोनच्या आयओएसवर फ्री व्हाईस कॉलिंग ची सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही प्रतिक्षा करावी लागणार आहे.

असा कराल वापर 

व्हॉट्स अॅपच्या 2.11.508 या लेटेस्ट अपडेटमध्ये उपलब्ध आहे. तसंच हे लेटेस्ट अपडेट गूगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्स अॅपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन APK फाईल डाऊन लोड करावी लागेल.

व्हॉट्स अॅपवरून फ्री व्हाईस कॉलिंग सुविधा काही निवडक प्रमाणात आणि चाचणीच्या पातळीवर सुरू झाल्याचं रेडिट या सोशल नेटवर्किंगवरून pradnesh07 या यूजरनं सांगितल्याचं अनेक गॅझेट स्पेशल साईटवर स्पष्ट करण्यात आलंय. या यूजरनं अँड्राईड 5.0 लॉलीपॉप या ओएसवर चालणाऱ्या नेक्सस 5 या स्मार्टफोनवरून व्हॉट्सअॅप फअरी व्हाईस कॉलिंग सुविधा मिळवल्याचा दावा केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.