मॉस्को : मोबाईल चॅटिंगवर तासनसास घालवणाऱ्या अनेकांना मंगळवारी झटका बसला. कारण, थोड्यावेळासाठी इंटरनेट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअप बंद पडलं होतं.
'आरटी डॉट कॉम'च्या माहितीनुसार, यूझर्सनं आपण व्हॉटसअपवर पाठवलेले संदेश दुसऱ्या बाजुला पोहचत नसल्याची तक्रार नोंदवली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉटस्अप सध्या आपलं अकाऊंट फेसबुक अकाऊंटशी इंटिग्रेट करण्यावर जोमात कार्यरत आहे.
उल्लेखनीय म्हणजे व्हॉटसअप हे सध्या जगभरात सर्वाधिक वापरलं जाणार अॅप आहे.