विराटची गर्लफ्रेंड कोण?...शाळेच्या परीक्षेतील प्रश्न

भारतचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमप्रकरण क्रिकेटसह बॉलीवूडमध्येही जोरदार गाजले.

Updated: Oct 17, 2016, 11:58 AM IST
विराटची गर्लफ्रेंड कोण?...शाळेच्या परीक्षेतील प्रश्न title=

मुंबई : भारतचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमप्रकरण क्रिकेटसह बॉलीवूडमध्येही जोरदार गाजले.

त्यांची लव्हस्टोरी केवळ क्रिकेट आणि बॉलीवूडपुरतीच मर्यादित राहिली नाही तर एका शाळेतील वार्षिक परीक्षेतील पेपरमध्ये चक्क विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण असा प्रश्नही विचारण्यात आला. 

भिवंडी येथील चाचा नेहरु हिंदी हायस्कूल शाळेच्या शारिरीक शिक्षण या विषयाच्या वार्षिक परीक्षेत चक्क विराटची गर्लफ्रेंड कोण असा प्रश्न विचारण्यात आला. सोबत तीन पर्यायही देण्यात आले. या पर्यायात प्रियंका, अनुष्का आणि दीपिका या तीन अभिनेत्रींची नावे देण्यात आली होती.