व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग

व्होडोफोन त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी स्कीम घेऊन आली आहे.

Updated: Aug 18, 2016, 09:02 PM IST
व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग  title=

मुंबई : व्होडोफोन त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी स्कीम घेऊन आली आहे. 1,999 रुपयांमध्ये व्होडाफोनच्या ग्राहकांना अनलिमिटेड रोमिंग, अनलिमिटेड कॉलिंग आणि 8 GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. 1699 रुपयांमध्ये ग्राहकांना फ्री रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत 6 GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. 

याबरोबरच 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 GB 3G-4G डेटा, 700 मिनीटांचं कॉलिंग आणि 500 एसएमएसचा समावेश आहे. कंपनीनं 699 आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत.