मुंबई : लग्नात गंमती - जमती तर अनेकदा पाहायला मिळतात... लग्नातला एक महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे वधु-वर एकमेकांना हार घालतात तो... सर्व उपस्थितांचं लक्ष या दोन 'उत्सवमूर्तीं'कडेच लागलेलं असतं... आणि याच वेळी वधु - वरात 'फाईट' लागली तर...
असाच एक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये वधु आणि वर एकमेकांना हार घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत... दोघांमध्ये हार घालण्यासाठी लागलेली ही चढाओढ तुमच्याही ओठांवर नकळत हसू खुलवेल, यात शंकाच नाही.... त्यामुळेच 'गिरधारीपूर की शादी' भलतीच व्हायरल झालेली दिसतेय....