केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा

सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त प्लान्सची ग्राहकांवर उधळण करण्याचा एक ट्रेन्डच सुरू आहे... या स्वस्त प्लान्सच्या घोडदौडीत 'युनीनॉर' या कंपनीनंही एक धम्माल प्लान सादर केलाय.

Updated: Apr 18, 2017, 06:11 PM IST
केवळ 75 रुपयांत महिनाभर अनलिमिटेड 4जी डाटा title=

नवी दिल्ली : सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांचा स्वस्त प्लान्सची ग्राहकांवर उधळण करण्याचा एक ट्रेन्डच सुरू आहे... या स्वस्त प्लान्सच्या घोडदौडीत 'युनीनॉर' या कंपनीनंही एक धम्माल प्लान सादर केलाय.

'जिओ'नं भरलेल्या धडकीमुळे बाजारात ही खळबळ सुरू झालेली आहे. नॉर्वेची टेलिकॉम कंपनी टेलिनॉर इंडियानं अनलिमिटेड 4जी पॅक लॉन्च केलाय. उल्लेखनीय म्हणजे, या कंपनीचे देशातील काही ठराविक सर्कलमध्येच 4जी सर्व्हिस सुरू आहे. टेलिनॉरनं FR73 प्लान लॉन्च केलाय. हा प्लान केवळ नव्या युझर्ससाठी आहे. 

'टेलिकॉम टॉक'नं दिलेल्या माहितीनुसार, या प्लानमध्ये 25 पैसे प्रति मिनिटच्या दरानं एसटीडी व्हॉईस कॉल असतील. हा प्लान 90 दिवसांसाठी वैध असेल. तसंच 25 रुपयांचा टॉकटाईमही यामध्ये फ्री मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड 4जी डाटा दिला जाईल. 

याशिवाय ग्राहक दुसऱ्या महिन्यात 47 रुपयांत रिचार्ज करून पुढच्या एका महिन्यापर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील. 73 रुपयांच्या रिचार्जनंतर 120 दिवसांच्या आता दुसरा रिचार्ज करावं लागेल. 120 दिवासानंतर रिचार्ज केल्यानंतर केवळ 400MB - 4जी डाटा मिळेल. 

ही ऑफर सध्या केवळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणा सर्कलसाठी उपलब्ध करून देण्यात आलीय.