पाहा 13 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह स्टीलपेक्षा मजबूत स्मार्टफोन

जेव्हा पण आपण स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा डिस्प्लेवर टॅम्पर आणि स्क्रीन गार्ड लावणं विसरत नाही. पण आता इतका मजबूत स्मार्टफोन येतोय, जो पडला तरी तुटणार नाही आणि पाण्यातही खराब होणार नाही. 

Updated: Aug 5, 2015, 01:21 PM IST
पाहा 13 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह स्टीलपेक्षा मजबूत स्मार्टफोन  title=

नवी दिल्ली: जेव्हा पण आपण स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा डिस्प्लेवर टॅम्पर आणि स्क्रीन गार्ड लावणं विसरत नाही. पण आता इतका मजबूत स्मार्टफोन येतोय, जो पडला तरी तुटणार नाही आणि पाण्यातही खराब होणार नाही. 

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को बेस्ड रोबोटिक इंडस्ट्रीनं हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीचा दावा आहे की, हा फोन अनब्रेकेबल आहे. तसंच हा फोन हॅकही करणं सोप्प नसेल.

हा फोन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. ट्यरिंग नावाचा हा फोन अमेरिकन मार्केटमध्ये लॉन्च केला गेलाय. हा हँडसेट तीन वॅरिएंट्स (16जीबी, 64जीबी, 128जीबी मेमरी)मध्ये लॉन्च केला गेलाय. ज्याची किंमत 160 डॉलर म्हणजे (जवळपास 39 हजार रुपये) आहे. यूजर्स हा कधी विकत घेऊ शकेल याबद्दल अजून कळलं नाहीय.

याचा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. याची बॉडी लिक्विडमोर्फियम (liquidmorphium) पासून बनवली गेलीय. कंपनीचा दावा आहे की हे अॅल्युमिनियम आणि स्टीलपेक्षा जास्त मजबूत मटेरिअल आहे.

या मटेरिअलचा अॅपच्या 'आयफोन 6'मध्येही वापर केला गेलाय. सोबतच त्याला वॉटरप्रूफ बनविण्यासाठी त्याच्या इंटर्नल पार्ट्समध्ये नॅनो कोटिंग केलं गेलंय. असं असूनही फोनचे सर्व पार्ट सहजपणे वेगळे केले जावू शकतात.

स्मार्टफोनचे फीचर्स: 
- 5.5 इंचचा डिस्प्ले, रिझॉल्यूशन 1080x1920 पिक्सेल
- 2.5GHz क्वाड कोर स्नॅपड्रॅगन 801 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, एलइडी फ्लॅश सह, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- कनेक्टिव्हिटीसाठी 4जी (LTE) सोबत Wi-Fi 802.11 ac, ब्लू-टूथ 4.0 LE, NFC, GPS/Glonass चे ऑप्शन असेल. 
- 3000mAh बॅटरी

कंपनीचा दावा आहे की, हा फोन पाण्यात पडला तर तो वाळवून पुन्हा वापरू शकतो. कंपनीनं या फोनचं प्री-बुकिंग 31 जुलैपासून सुरू केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.