ट्विटर ट्रेन्ड #WorstChildhoodRumors... तुम्ही सहभागी झालात का?

लहाणपणी तुम्ही ऐकलेली आणि त्यावेळी खरोखरच तुमचा विश्वास बसला होता... अशी एखादी अफवा सांगा... असा प्रश्न आज तुम्हाला विचारला तर... तुमच्याकडे तर अशा अफवांच्या आठवणींचा खजिना सापडेल... होय ना. 

Updated: Jun 11, 2015, 01:00 PM IST
ट्विटर ट्रेन्ड #WorstChildhoodRumors... तुम्ही सहभागी झालात का? title=
एकमेकांना जोडलेली फळं खाल्ली तर जुळी मुलं होतात

मुंबई : लहाणपणी तुम्ही ऐकलेली आणि त्यावेळी खरोखरच तुमचा विश्वास बसला होता... अशी एखादी अफवा सांगा... असा प्रश्न आज तुम्हाला विचारला तर... तुमच्याकडे तर अशा अफवांच्या आठवणींचा खजिना सापडेल... होय ना. 

असाच एक ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे. #WorstChildhoodRumors या हॅशटॅगसहीत ट्विटरचे युजर्स आपल्या असंख्य आठवणी शेअर करत आहेत. 

याच आठवणींसह काही गंमतीशीर ट्विटस्...

- जर तुम्ही एखाद्या फळाची बी चुकून गिळली तर तुमच्या पोटात झाड उगवेल.

- हिंदू देव-देवता दूध पितात... आम्हीही त्यांना दूध पाजायला जायचो

- तुम्हाला हिंदी येत नाही म्हणजे तुम्ही भारतीय नाही

- सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी हे भाऊ-बहिण आहेत

- जर सरडा तुमच्या अंगावर पडला किंवा पक्षानं तुमच्या अंगावर घाण केली तर तो दिवस तुमच्यासाठी लकी डे असतो

- जर तुम्ही तुमचे डोळे मुद्दाम तिरळे करण्याचा प्रयत्न केला तर ते तिथेच अडकतील

- नाण्यांवरून ट्रेनचं चाक गेलं तर त्या नाण्याचं लोहचुंबकात रुपांतर होतं. 

- जर तुमचं डोकं चुकून कुणाच्या डोक्यावर आपटलं तर दुसऱ्यांदा तुम्ही स्वत:हून डोकं त्याच्या डोक्यावर आपटून घेतलं नाही तर कुत्रा चावतो / शिंग फुटतं. 

- तुम्ही खूप अभ्यास केला आणि चांगले विद्यार्थी बनलात तर तुम्ही मोठे झाल्यावर यशस्वी होता.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.