स्मार्टफोन ग्राहकांसाठी ट्विटरनं आणलंय नवं फीचर!

ट्विटरनं आपल्या मोबाईल अॅपमध्ये नवं फीचर आणलंय. ज्याच्या मदतीनं आपण आपलं ट्विट किती जणांनी वाचलं, रिट्विट केलं हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितलं, “यासाठी आपल्याला ट्विटरच्या अॅनॅलिटिक्स पेजवर साइन इन करावं लागेल, जेणेकरून कंपनी आपल्या मोबाईल डेटाचा संग्रह सुरू करू शकाल.” 

Updated: Dec 28, 2014, 02:02 PM IST
स्मार्टफोन ग्राहकांसाठी ट्विटरनं आणलंय नवं फीचर! title=

मुंबई: ट्विटरनं आपल्या मोबाईल अॅपमध्ये नवं फीचर आणलंय. ज्याच्या मदतीनं आपण आपलं ट्विट किती जणांनी वाचलं, रिट्विट केलं हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितलं, “यासाठी आपल्याला ट्विटरच्या अॅनॅलिटिक्स पेजवर साइन इन करावं लागेल, जेणेकरून कंपनी आपल्या मोबाईल डेटाचा संग्रह सुरू करू शकाल.” 

या फीचरचा वापर करण्यासाठी आपल्याला ट्विटर अॅप अपग्रेड करावं लागेल. अपग्रेड झाल्यानंतर ट्विटरवरील आपल्या एखाद्या जुन्या ट्विटवर टॅप करून पाहा... खाली ‘व्यू अॅनॅलिटिकल डिटेल्स’ नावानं एक लिंक दिसेल. या लिंकवर जाताच आपल्याला आपल्या त्या ट्वीट संदर्भातील आकडेवारी मिळेल. यात इंप्रेशन्सची संपूर्ण संख्या, आपलं ट्विट पाहणाऱ्यांची संख्या दिसेल. तर एंगेजमेंट्सच्या रूपात असलेली संख्या म्हणजे रिट्विट, फेवरेट यांची मिळून संख्या असेल.   

थोडं खाली गेल्यास एंगेजमेंटचे आकडे टक्केवारीच्या रूपात दिसतील. ट्विटरनं सध्या ही सेवा फक्त अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या उपकरणांवरच दिलीय. मात्र लवकरच ही सेवा अँड्रॉइड, विंडोज आणि इतर ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाइलवरही सुरू होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.