नवी दिल्ली : हल्ली स्मार्टफोन ही प्रत्येकी गरजेची वस्तू बनली आहे. तो नसेल काही कामच होत नाही. मात्र स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे काही काळानंतर तो स्लो होतो. यामुळे तो सतत हँग होत असतो. याचे कारण म्हणजे स्मार्टफोनमध्ये असलेले अॅप्स ज्यामुळे फोनचा स्पीड कमी होतो. गेमिंग, व्हिडीयोचे अॅप ज्यामुळे बॅटरी आणि मेमरी लवकर संपते. तसेच हे अॅप्स फोन सतत हँग करतात.
गुगलने नुकतेच अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम मार्शमेलो लाँच केलाय. ज्यामुळे तुम्ही हँडसेटच्या रॅम आणि मेमरीवर लक्ष ठेवू शकता. तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी आणि मेमरी कशी वाचवू शकता. खाली वाचा
स्टेप १. स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन मेमरी हा ऑप्शन क्लिक करा. यात तुमच्या फोनमध्ये किती मेमरी आहे हे समजेल.
स्टेप २. यानंतर मेमरी यूज बाय अॅप या ऑप्शनला निवडा. यात तुम्ही वापरत असलेले सर्व अॅप्स दिसतील.
स्टेप ३. यानंतर जे अॅप तुम्हाला नकोयत ते अनइन्स्टॉल करुन टाका. ज्यामुळे तुमच्या फोनची मेमरी राहील आणि फोन हँग होणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.