आता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड

व्हॉट्स अॅपमध्ये एक असं फीचर आलंय जे सांगेल तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये एक असं फीचर अॅड केलंय, जे पाहून आपण आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी जाणून घ्याल.

Updated: Sep 6, 2015, 12:20 PM IST
आता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड title=

मुंबई: व्हॉट्स अॅपमध्ये एक असं फीचर आलंय जे सांगेल तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये एक असं फीचर अॅड केलंय, जे पाहून आपण आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी जाणून घ्याल.

व्हॉट्स अॅपचं हे फीचर आपल्याला केवळ बेस्ट फ्रेंडबद्दल नाही तर आपल्या व्हॉट्स अॅप वापराबद्दलची प्रत्येक महत्त्वाची माहिती देईल. या फीचरचा वापर अगदी सोपी आहे.

आणखी वाचा - व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

व्हॉट्स अॅपवर गेल्यानंतर सेटिंग्जमध्ये जा... मग सेटिंग्जमध्ये जावून स्क्रोल करा खाली 'Network usage'चं ऑप्शन मिळेल. ते उघडताच आपल्यावा आपण व्हॉट्स अॅपवरून किती मॅसेज पाठवले आणि किती रिसिव्ह केले याची संपूर्ण माहिती मिळेल. याशिवाय आपण व्हॉट्स अॅपवरून किती कॉलिंग केलं हे सुद्धा कळेल.

या फीचरमुळे फोनमधील डेटा आणि स्पेसचा किती वापर होतो हे कळतं. इंग्रजी वृत्तपत्र द टेलिग्राफनुसार व्हॉट्स अॅपनं हे फीचर जून महिन्यातच २.१२.३ व्हर्जनसह लॉन्च केलंय. 

आणखी वाचा -  तुम्ही स्मार्टफोन वापरताय, मग या पाच चुका टाळा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.