व्हॉट्सअॅपवर असे समजते आपला DP कोणी पाहिला ते?

तुमचा फेसबुक डी.पी. कोणी पाहिलाय का? हे साधारणपणे लाईक्सवरून आपल्याला समजते, मात्र व्हॉट्सअॅपवर तुम्ही अपडेट केलेला DP कोणी पाहिलाय की नाही, हे समजते का ?

Updated: Jun 11, 2016, 08:10 PM IST
व्हॉट्सअॅपवर असे समजते आपला DP कोणी पाहिला ते? title=

मुंबई : तुमचा फेसबुक डी.पी. कोणी पाहिलाय का? हे साधारणपणे लाईक्सवरून आपल्याला समजते, मात्र व्हॉट्सअॅपवर तुम्ही अपडेट केलेला DP कोणी पाहिलाय की नाही, हे समजते का ?

Hi, Finally now we can see who checked our whatsapp dp, last seen, status. It was shocking to check who is stalking my whatsapp last seen and dp regularly. You too check yours at https://giftsfortasks.com/who-viewed

असा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय. असे मेसेजेस खोटे असतात असे समजून अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण काहींनी उत्सुकतेपोटी ही लिंक उघडून पाहिली. तेव्हा त्यांना या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कळलेच असेल. कारण अद्याप व्हॉट्सअॅपमध्ये तुमचा DP वा स्टेटस कोणी पाहिले हे सांगू शकणारे फीचर आलेलेच नाही.

हा मेसेज आणि लिंक खोटे असल्याचे उघड झालेले आहे. डीपी कोणी पाहिला, हे जाणून घेण्याच्या नादात अनेक यूजर्स नको तेवढे अॅप डाऊनलोड करतात.
त्यामुळे अशा खोट्या लिंक्स आणि मेसेजपासून नेटीझन्सनी सावध राहिलेलेच बरे!!