या 7 कारणांमुळे बिझनेसमध्ये यशस्वी असतात मारवाडी लोक

बिझनेसच्या मैदानात मारवाडी लोकांना अधिक यश मिळते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? थॉमस ए.टिंबर्ग यांचे पुस्तक  The Marwaris: From Jagath Seth to the Birlas यामध्ये यशस्वी होण्यामागची कारणे देण्यात आलीयेत. य

Updated: Nov 5, 2016, 01:05 PM IST
या 7 कारणांमुळे बिझनेसमध्ये यशस्वी असतात मारवाडी लोक title=

मुंबई : बिझनेसच्या मैदानात मारवाडी लोकांना अधिक यश मिळते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? थॉमस ए.टिंबर्ग यांचे पुस्तक  The Marwaris: From Jagath Seth to the Birlas यामध्ये यशस्वी होण्यामागची कारणे देण्यात आलीयेत. य

1. मारवाडी लोक व्यापारात अशा ठिकाणी पैसा गुंतवतात ज्यामुळे लाँग टर्म फायदा होईल. ज्या ठिकाणी शेअरमध्ये पैसे गुंतवतात त्याच्या आर्थिक स्थितीवर सतत नजर ठेवून असतात.

2. व्यापार कधीही एकट्याला शक्य नसतो. त्यासाठी माणसांची गरज पडते. त्यामुळे तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी काम करत असलेल्या लोकांवर विश्वासासोबतच त्यांच्या कामावरही लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे असते. 

3. कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी त्याबाबतचा विशिष्ट प्लान आखला पाहिजे. तसेच केवळ नियोजन करुनही फायदा नाही तर तो प्लान अंमलात आणणेही तितकेच गरजेचे असते.

4. आपला बिझनेस कसा वाढले याबाबत कटाक्ष असावे. अनेक कंपन्या आपला उद्योग वाढवण्याबाबतच्या योजना बनवतात. मात्र त्या प्रत्यक्षात आणणे सफल होत नाही. 

5. कोणत्याही फर्म अथवा कंपनीचे कल्चर हे मार्केट आणि वेळेनुसार बदलले गेले पाहिजे. वेळेनुसार काही गोष्टीत बदल होणे गरजेचे असते. 

6. मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींची क्रेझ आहे यावर अधिक लक्ष न दिलेलेच बरे. कारण अशा क्रेझ जास्त काळ टिकत नाहीत. 

7. बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर काळानुसार बदलणे आवश्यक असते. काळानुसार बदलत चाललेले तंत्र तसेच अन्य बदलांना अंगिकारणे गरजेचे असते.