या ५ गोष्टी असलेले पुरुष महिलांना आवडतात

पुरुष आणि महिला यांच्यामध्ये आकर्षण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये दोघांची वेगवेगळी पंसद असू शकते. महिलांना कसे आणि कोणते पुरुष आवडतात या बाबत एक सर्वे करण्यात आला आहे. पाहा काय आहे महिलांची पंसद.

Updated: Apr 18, 2016, 10:54 AM IST
या ५ गोष्टी असलेले पुरुष महिलांना आवडतात title=

मुंबई : पुरुष आणि महिला यांच्यामध्ये आकर्षण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये दोघांची वेगवेगळी पंसद असू शकते. महिलांना कसे आणि कोणते पुरुष आवडतात या बाबत एक सर्वे करण्यात आला आहे. पाहा काय आहे महिलांची पंसद.

महिलांना या ५ गोष्टी असलेले पुरुष आवडतात :

१. हुशार : इंटेलीजंट पुरुष ही महिलांची पहिली आवड असते. हुशार पुरुषांना महिला अधिक पसंद करतात. ज्यांचं सामान्य ज्ञान खूप चांगलं आहे. जे छोट्या-छोट्या गोष्टी मनावर नाही घेत कारण हे ताण-तणावापासून दूर राहण्याचं कारण आहे. असं पुरुष महिलांना आवडतात.

२. संवेदनशील : जे पुरुष अधिक सेंसेटीव्ह असतात अशा पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. जे संवेदनशील असतात असे पुरुष खूप चांगल्या प्रकारे बोलतात. अशा पुरुषांच्या मनात काहीही लपून नाही राहत. ते मनात काहीही लपवून नाही ठेवत म्हणून महिलांना असे पुरुष आवडतात.

३. सेंस ऑफ ह्यूमर : ज्यांचं सेंस ऑफ ह्यूमर हे चांगलं असतं आणि जे नेहमी हसवतात. आजूबाजूच्या लोकांना जे नेहमी खूश ठेवतात असे पुरुष महिलांना आवडतात. 

४. कुकिंग : जवळपास ८० टक्के महिलांचं असं म्हणणं आहे की, जे पुरुष किचनमध्ये स्वयंपाक खूप चांगला बनवतात असे पुरुष त्यांना आवडतात.

५. हेल्पिंग नेचर : जे पुरुष महिलांना त्यांच्या कामात मदत करतात. महिलांना सन्मान करतात. काही तरी चुकीचं होतंय हे माहित असतांना शांत बसत नाहीत. कौटुंबिक असो की सामाजिक अशा दोन्ही गोष्टीत जे मदत करण्याचं नेचर ठेवतात. जे खूप भावूक आणि दयाळू असतात असं पुरुष महिलांना आवडतात.