चांगल्या मुलांचा प्रेमभंग का होतो?

अनेकदा खरं प्रेम करुनही त्या मुलाचा अथवा मुलीचा प्रेमभंग होतो. मात्र त्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का?

Updated: Apr 17, 2016, 03:28 PM IST
चांगल्या मुलांचा प्रेमभंग का होतो? title=

मुंबई : अनेकदा खरं प्रेम करुनही त्या मुलाचा अथवा मुलीचा प्रेमभंग होतो. मात्र त्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का?

१. अनेकदा मुले त्यांच्या गर्लफ्रेंडला आधीच्या गर्लफ्रेंडबाबत काही सांगत नाही. मात्र जी मुले इमानदार असतात ते त्यांच्या गर्लफ्रेंडला या सर्व गोष्टी आधीच क्लिअर करतात. यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येते.

२. चांगली मुले खूप केअरिंग असतात. यासाठी ते आपल्या पार्टनरची प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ इच्छितात. मात्र अनेक मुलींना मुलांचा हा स्वभाव पटत नाही. 

३. अशी मुले स्वत:च्या सिद्धांतावर जगण्यावर भर देतात. त्यामुळे अनेकदा मुली यांना नापसंत करु लागतात. 

४. मुलींना प्रेम हवे असते मात्र गरजेपेक्षा अधिक काळजी करणारा बॉयफ्रेंड त्यांना आवडत नाही. अशा स्वभावामुळेही चांगल्या मुलांना प्रेमात नकार मिळतो.

५. अशी मुले अनेकदा स्वत:चच खर करण्यावर भर देतात. त्यामुळे अनेक मुलींना हा स्वभाव पटत नाही.