या गोष्टी पुढील काही वर्षांत हद्दपार होऊ शकतात

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बदल घडत असतात.

Updated: Jan 23, 2016, 04:46 PM IST
या गोष्टी पुढील काही वर्षांत हद्दपार होऊ शकतात title=

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बदल घडत असतात. यामुळे भविष्यात येणारे तंत्रज्ञान काय करू शकते, याविषयी आपण काही कल्पनाही करू शकत नाही. खाली दिलेल्या काही गोष्टी पुढील काही वर्षांत हद्दपार होऊ शकतात.

१. ATM कार्ड

आता नेट बँकींग इतके सोपे होत आहे की ATM कार्ड हद्दपार होऊ शकते. रोज जाऊन पैसे काढण्याची गरज राहणार नाही की रोख रक्कम देण्याचीही गरज भासणार नाही. नुसते मोबाईलच्या एका क्लिकवर पैशांचे व्यवहार करणे सहज शक्य होईल.



२. मेमरी कार्ड

मोबाईल मध्ये कदाचित भविष्यात मेमरी कार्डाची गरज भासणार नाही. क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून अनलिमीटेड स्टोअरेजची सोय उपलब्ध होईल.



३. पासवर्ड

पासवर्डही भविष्यात हद्दपार होऊ शकतात. हे मान्य करणे कठीण आहे. पण, आवाजाच्या माध्यमातून सिक्युरिटी पुरवली जाऊ शकते.



४. रिमोट कंट्रोल

टाळी वाजवून, आवाजाच्या माध्यमातून आता ऑर्डर देणे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. तेव्हा भविष्यात रिमोटची गरजही भासणार नाही.



५. गाडीची चावी

गाडीची चावी आता हरवण्याची चिंता करण्याचे कारण नाही. कारण, तुमच्या मोबाईलद्वारे गाडीचा दरवाजा उघडता येईल. काही महागड्या गाड्यांमध्ये आत्ताच ही सोय आहे.



६. की बोर्ड

आता टायपिंग करताना बोटं दुखण्याचीही चिंता राहणार नाही. कारण तुम्ही जे उच्चाराल ते कॉम्प्युटर टाईप करेल. सध्या काही सॉफ्टवेअर्स ही सुविधा देतात