अवघ्या ३१ हजार रुपयांत मिळतेय ही बाईक

पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) लाँच केलीय. बजाजची ही नवी बाईक स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या तुलनेत चार हजार रुपयांनी स्वस्त आहे. 

Updated: Jan 23, 2016, 11:35 AM IST
अवघ्या ३१ हजार रुपयांत मिळतेय ही बाईक title=

मुंबई : पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) लाँच केलीय. बजाजची ही नवी बाईक स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या तुलनेत चार हजार रुपयांनी स्वस्त आहे. 

बजाजची सीटी 100बीची किंमत ३१ हजार (एक्स शोरूम, दिल्ली) इतकी आहे. आतापर्यंतची ही सर्वात स्वस्त बाईक आहे. या बाईकमध्ये काही बदल करण्यात आलेय मात्र इंजिनची क्षमता तितकीच ठेवण्यात आलीय. 

यात सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, ९९.२७ सीसीचे इंजिन बसवण्यात आलेय. ही बाईक प्रतिलीटर ९० किमी धावू शकते असा दावा कंपनीने केलाय. 

काही दिवसांपूर्वीच बजाजने सर्वाधिक विकली जाणारी १००सीसी कम्यूटर बाईकच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. बजाजच्या या सीटी १००बी ची टक्कर हीरो एचएफ डिलक्स, टीव्हीएस स्टार सिटी प्लस, होंडा ड्रीम निओ सांरख्या बाईकशी असणार आहे.