तुमच्या 'अॅन्ड्रॉईड'ला व्हायरसचा धोका...

तुम्ही जर अॅन्ड्रॉईड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे... नुकताच एका नव्या 'बग'चा शोध लागलाय...

Updated: Jul 31, 2015, 02:45 PM IST
तुमच्या 'अॅन्ड्रॉईड'ला व्हायरसचा धोका...  title=

नवी दिल्ली : तुम्ही जर अॅन्ड्रॉईड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे... नुकताच एका नव्या 'बग'चा शोध लागलाय... हा बगनं तुमच्या मोबाईलला टार्गेट केलं तर तुम्हाला तुमचा महागडा मोबाईल फेकून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

हा बग अॅन्ड्रॉईड ४.३ जेलीबीन ते अॅन्ड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या सगळ्याच डिव्हाईससाठी धोकादायक ठरू शकतो. 

गुगलच्या नेक्सस स्मार्टफोनला 'स्टेजफ्राईट वल्नरेबिलिटी' या व्हायरसपासून सुरक्षित करण्यासाठी सिक्युरिटी अपडेट जाहीर केल्यानंतर अॅन्ड्रॉईडमधल्या या नव्या त्रुटीचा शोध लागलाय.

ही त्रूट मीडिया सर्व्हर सर्व्हिसमध्ये सापडलीय. याचा वापर अॅऩ्ड्रॉईड मोबाईलमध्ये असलेल्या मीडिया फाइल्स इंडेक्स करण्यासाठी करतो. 'बग' शिरल्यानंतर ही प्रोसेसिंग योग्य रितीनं काम करणं बंद करतं.  

हा व्हायरस खूपच धोकादायक असून त्यामुळे तुमचा स्मार्टफोन डेड होण्याची दाट शक्यता आहे. हा बग मोबाईलमध्ये घुसला तर तुमचा फोन सायलंट मोडवर जाईल... तुम्हाला कोणताही फोन कॉल घेता येणार नाही इतकंच नाही तर स्क्रिनवरही काहीही दिसू शकणार नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.