फेसुबकचा अॅपवर नवा पर्याय, आता अनावश्यक पोस्ट पाहणं टाळा!

फेसबुकवर आपले असंख्य मित्र असतात, अनेक पेजेस तुम्ही लाईक केलेले असतात. सतत हजारो पोस्ट पडत असतात. पण तुम्हाला सगळ्या पोस्ट पाहणं शक्य नसतं किंवा ते त्रासदायकही होतं. 

Updated: Jul 30, 2015, 09:43 PM IST
फेसुबकचा अॅपवर नवा पर्याय, आता अनावश्यक पोस्ट पाहणं टाळा! title=

मुंबई: फेसबुकवर आपले असंख्य मित्र असतात, अनेक पेजेस तुम्ही लाईक केलेले असतात. सतत हजारो पोस्ट पडत असतात. पण तुम्हाला सगळ्या पोस्ट पाहणं शक्य नसतं किंवा ते त्रासदायकही होतं. 

पण आता फेसबुकनं यावर उपाय शोधला आहे. फेसबुकच्या अॅपवर तुम्हाला न्यूज फिडमध्ये कोणाचे पोस्ट पहिले दिसले पाहिजे हे आता तुम्हालाच ठरवता येणार आहे. सध्या ही सुविधा आयफोन ग्राहकांसाठी असली तरी लवकरच अँड्रोईड ग्राहकांनाही ही सुविधा दिली जाणार आहे. 

फेसबुकवर दर तासाला १० कोटी फोटो अपलोड होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. यावरुन फेसबुकवरील पोस्टचं प्रमाण किती असेल हे लक्षात येतं. फेसबुकवरील या लाखो पोस्टमधील आपल्या कामाची पोस्ट शोधणं म्हणजे त्रासदायकच. पण फेसबुकनं आता यावर उपाय शोधला आहे. फेसबुकनं काही दिवसांपूर्वी iOS युजर्ससाठी 'सी फर्स्ट' ही सुविधा दिली आहे. 

आयफोन ग्राहकांनी फेसबुक अॅपवर मोअरमध्ये जायचं. यानंतर 'न्यूज फिड प्रिफरन्सेस'वर क्लिक करुन आवश्यक व्यक्तींची निवड करायची. यानंतर तुम्हाला अॅपमध्ये तुम्ही निवडलेल्या व्यक्तींचे पोस्ट पहिले दिसेल. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.