www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिर्घकाळ अंतराळत राहणारी जगातील पहिली महिला आहे.अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता भारत भ्रमण करणार आहे. तिच्या भारत भ्रमणाला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे.
सुनीता अमेरिकी नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहे. ती प्रथम दिल्ली येथील नॅशनल सायन्स सेंटरला भेट देणार आहे. तेथील विद्यार्थ्यी तसेच शिक्षकांशी ती संवाद साधणार आहे. या भेटीबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यापूर्वी तिने २००७मध्ये मुबंईमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
सुनिता विल्यम्स ही ४ एप्रिलला मुंबईत येणार असून येशील नेहरू सायन्स सेंटरला भेट देणार आहे.या दौऱ्याच्या अखेरीस ती गुजरातमधील आपल्या नातेवाईकांची भेट घेणार आहे. गुजरातमधील आपल्या नातलगांना भेटण्याची सुनीताची प्रदीर्घ इच्छा या दौऱ्यादरम्यान पूर्ण होणार आहे. सुनीताचे वडील गुजरातमधील महेसणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.