सोशल मीडियावर 'असहिष्णुता', आमिरला ५३ लाख कानाखाली

देशातील असहिष्णुततेप्रकरणी विधान करणाऱ्या आमिर खानविरोधात देशभरातून तीव्र टीका केली जातेय. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी टीकेचा जोरदार सूर आळवलाय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने आमिरला कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

Updated: Nov 30, 2015, 09:41 AM IST
सोशल मीडियावर 'असहिष्णुता', आमिरला ५३ लाख कानाखाली title=

मुंबई : देशातील असहिष्णुततेप्रकरणी विधान करणाऱ्या आमिर खानविरोधात देशभरातून तीव्र टीका केली जातेय. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी टीकेचा जोरदार सूर आळवलाय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने आमिरला कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

त्यानंतर आमिरच्या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी एक वेबसाईट बनवलीये ज्या वेबसाईटवर आमिरला थोबाडीत मारता येईल. slapaamir.com या नावाने ही वेबसाईट आहे. 

वेबसाईट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत आमिर खानला ५३ लाखाहून अधिक कानाखाली मारण्यात आल्यात. तुम्ही या वेबसाईटवर गेल्यानंतर कर्सर हलवल्यास आमिरच्या फोटोवर कानाखाली बसल्याचा आवाज ऐकू येतो. मायामी अॅड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही साईट बनवलीये. 

काही दिवसांपूर्वी आमिरने एका कार्यक्रमादरम्यान देशातील वाढत्या असहिष्णुततेमुळे आपल्या पत्नीने आपल्याला देश सोडून जाण्याबद्दल सुचविले होते असे विधान केले. 

या विधानानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र सोशल मीडियावर आमिरविरोधात अशा प्रकारे रोष व्यक्त करणे कितपत योग्य आहे. अशा प्रकारे नेटकरीच सोशल मीडियावर असहिष्णुतता पसरवत नाहीयेत का? या प्रश्नावर खोलवर विचार करणे गरजेचे आहे.

आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यानुसार आमिरने केवळ त्याचे मत व्यक्त केले. मात्र त्याच्या मताचा अशाप्रकारे निषेध करणे कितपत योग्य आहे? अशा प्रकारच्या कृत्यांनी सोशल मीडियाद्वारे देशात असहिष्णुतता पसरवली जात नाही का? याबाबतही विचार व्हावा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.