हैदराबाद : फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला आंध्रप्रदेश तसेच ओरिसामध्ये हुडहुड वादळाने मोठे नुकसान केले. राहुल रेड्डी नावाच्या युवकाने ‘निसर्गाला धोका देणाऱ्यांना पकडून पकडून शिक्षा केल्याने हुडहुड आवडली. त्यामुळे देवाच्या अस्तित्वावर माझा विश्वास बसला‘ अशी प्रतिक्रिया फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली होती.
एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या याबाबत पोलिसात तक्रार केल्याने राहुलला अटक करण्यात आली.
कायद्याच्या पदवीतील शेवटच्या वर्षीच्या विद्याथ्याने या नैसर्गिक आपत्तीवर बेजबाबदार, जनविरोधी प्रतिक्रिया फेसबुकवर पोस्ट केली होती, असे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक द्वारका तिरुमला राव यांनी सांगितले.
वायएसआरपी या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेला राहुल रेड्डी याने 12 ऑक्टोबरला फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.