मुंबई : एन्ड्रॉईड स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर इंटरनेट सर्फिंगचा स्पीड कमी असेल तर मूड खराब होतो.
आता ४झी कनेक्टीव्हीट अनेक शहरांमध्ये आली आहे. देशभरात रिलायन्स जिओ या वर्षाच्या शेवटी आपली ४ जी सेवा लॉन्च करू शकतो. त्यामुळे देशातील मोठ्या भागात ४ जी सेवा मिळणे सोईस्कर होणार आहे.
पण केवळ ४ जी कनेक्टिव्हिटीनेच आपल्या इंटरनेट सर्फिंग फास्ट होऊ शकत नाही. त्यासाठी अनेकही पर्याय आहे.
तुम्ही स्मार्टफोनवर क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर अॅड्रेस बारमध्ये chrome://flags/#max-tiles-for-interest-area टाइप करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा
ब्राऊझिंगचा स्पीड
त्या ठिकाणी तुम्हांला मॅक्सिमम टाइल्स फॉर इंटरेस्ट एरिया लिहिले दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी एक ड्रॉप डाऊन मेनू दिसायला लागेल. जिथे डिफॉल्ड '64', '128', '256', '512' लिहिलं असेल.
त्या ठिकाणी तुम्ही आपली सेटिंग '512' करतात तर तुमची ब्राऊझिंग स्पीड वाढल्याचे दिसून येईल.
असे केल्याने तुम्ही तुमच्या क्रोम ब्राऊझरला जास्त मेमरी किंवा रॅम देण्याचा आदेश दिला आहे. असे केल्यावर तुमच्या स्क्रिनवर 'रिलॉन्च नाऊ' लिहिलेलं दिसेल. त्यानंतर क्रोम जास्त मेमरी तुमच्यासाठी लॉन्च करेल.
लवकर लोड होणार वेबपेज
तुम्ही स्मार्टफोनवर जावा स्क्रिट ऑफ केल्यास तुमचे वेबपेज लवकर ओपन होईल. पण त्यात कोणताच रंग दिसणार नाही. सर्व काही साधारण दिसेल.
यासाठी तुम्हांला स्मार्टफोन ब्राऊझरच्या उजव्या बाजूनला तीन बिंदूंना टॅप केल्यास त्यात अॅडव्हान्सवर क्लिक केल्यास येणाऱ्या स्क्रिलवर खाली गेल्यास जावा स्क्रीप्ट इनेबल असेल. त्याचे टीक मार्क हटविल्यास ब्राऊझरचा स्पीड वाढेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.