गुड न्यूज - बाजारात येणार सोलर स्कूटर

 डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर एक खुशखबर... ईटीआय डायनामिक्सने शुक्रवारी सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड स्कूटर लॉन्च केली आहे. 

Updated: May 22, 2015, 08:55 PM IST
गुड न्यूज - बाजारात येणार सोलर स्कूटर  title=

नवी दिल्ली :  डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर एक खुशखबर... ईटीआय डायनामिक्सने शुक्रवारी सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड स्कूटर लॉन्च केली आहे. 

स्कूटर डिझाइन करण्याचा मुख्य उद्देश पर्यावरणाला प्रदुषण मुक्त ठेवायचे आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की यात स्मार्ट चार्जिंग टेक्निकचा वापर केला आहे. 

स्कूटरच्या वरील छताला सोलर पॅनल लावण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक सिस्टिमवर आधारीत या स्कूटरची बॅटरी सोलर एनर्जीने चार्ज होते. 

ही देशातील पहिली स्कूटर आहे, जी सुरू असताना चार्ज होऊ शकते. एकदा चार्ज झाल्यावर ती ५० किलोमीटर पर्यंत चालते. त्याचा सर्वाधिक स्पीड ताशी ८० किमी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.